औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीन तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर वायरल केला होता. याप्रकरणी एमआयएम ने माफी मागावी अन्यथा आज रात्री शहरातील एमआयएमची सर्व कार्यालय फोडण्यात येतील असा इशारा शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका अल्पवयीन तरुणाने एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करा असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओ प्रकरणी दोन दिवसापूर्वीच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्या तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे. त्यासोबत एका दुसऱ्या देखील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यापूर्वी अल्पवयीन तरूणाने मी एमआयएम च्या सांगण्यावरून तो व्हिडिओ तयार केला होता आणि तो दुसऱ्याच तरुणांनी सोशल मीडियावर वायरल केला. त्याबद्दल मी सर्व सर्वांची माफी मागतो असे म्हणत दुसरा व्हिडीओ सर्व सोशल मीडियावर वायरल करण्यात आला आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागितली नाही. त्याबद्दल आज सायंकाळी आठ वाजेपर्यंत एमआयएम पक्षाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, नाहीतर आज रात्री शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव हे गोव्यातून आठ वाजता औरंगाबाद चिकलठाणा विमानतळावर येणार आहेत. आजच्या नंतर शहरातील सर्व एमआयएम कार्यालय उद्ध्वस्त करणार आहेत असा त्यांनी गर्भित इशारा दिला आहे. त्याबरोबरच जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व मावळ्यांना विमानतळ येथे येण्याची देखील आव्हान केली आहे. तेथूनच ते थेट एमआयएम च्या कार्यालयावर धडकणार आहेत. असे त्यांनी एका व्हिडिओद्वारे आपले मत मांडले आहे. याबाबत पोलीस प्रशासनाची संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही